ताक आणि मठ्ठा यात काय फरक असतो?

ताकआणि मठ्ठा हे दोन्ही दह्यापासून बनवतात. दूध गरम करुन सायीसकट विरजायचे. त्याचे दही तयार झाले की त्यात योग्य प्रमाणात पाणी घालूनते घुसळायचे. घुसळल्यानंतर दह्यातील स्निग्ध पदार्थ लोण्याच्या रुपात वर येतात. लोणी बाजूला काढायचे, जो द्रव शिल्लक राहतो ते म्हणजे ताक.

ताकाला संस्कृतमध्ये तक्र म्हणतात. आयुर्वेदात ताकाला बहुगुणी मानले आहे. जेवणानंतर थोडेसेसैंधव आणि हिंग घातलेले ताकप्यायल्यास पचनाची प्रक्रिया सुधारते. उन्हाळ्यात ताक थंडावा देते.

ताक विविध प्रकाराने वापरतात. कढी, मठ्ठा, लस्सी इत्यादी.

मठ्ठा हा ताकाचाच वेगळा प्रकार आहे, ताकात आलं, मिरची, कोथिंबिर वाटून घालतात. चवीला मीठ घालून केलेले ताक म्हणजे मठ्ठा. आपल्याकडे जेवणात जिलबीबरोबर मठ्ठा असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *