भिशी म्हणजे काय?

भिशी म्हणजे बिनव्याजी गुंतवणूक
भिशी म्हणजे बिनव्याजी कर्ज
भिशी म्हणजे सहकारी पद्धतीने एकमेकांना केलेली मदत
भिशी म्हणजे समूहाने केलेले नियम आणि ती पाळण्याची जबाबदारी
भिशी म्हणजे बचत व भांडवल नियोजन

भिशी म्हणजे,एखाद्या ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात.भिशीला हिंदी भाषेमध्ये वीसी किंवा भीसी या बरोबरच कमिटी,पियर टू पियर पद्धत देखील म्हणतात.

भिशी प्रकारांमध्ये घरगुती भिशीचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. यात प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. उदाहरणार्थ ग्रुपमध्ये 10 सदस्य आहेत. तर प्रत्येक सदस्याकडून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला 1 हजार रूपये गोळा केले जातात. जमा झालेले हे 10 हजार रूपये चिठ्ठ्या टाकून ज्या सदस्याचे चिठ्ठीत नाव येईल त्याला दिले जातात. ज्याचे नाव चिठ्ठीत येते त्याच्या नावाची चिठ्ठी पुन्हा बनवली जात नाही. पण त्याला प्रत्येक महिन्याला त्याचा 1 हजार रूपयांचा वाटा मात्र द्यावा लागतो. घरगुती भिशीप्रमाणे भिशीचे आणखीही काही वेगवेगळ्या पद्धती आहेत.

जेव्हा एखादा व्यक्ती बिजनेस करतो तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल करावी लागते. अनेकदा पैशांची गरज पडते.अशावेळी दरवेळी बँकेकडून कर्ज घेणे परवडत नाही.या बरोबरच बँकेकडून कर्ज मिळणे इतके सोप्पे नाही.अशा वेळी भिशी अत्यंत उपयुक्त ठरते.भिशीला अनेक व्यापारी प्राईवेट फंड सिस्टम म्हणतात.
साधारण प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून ,पैसे गोळा करून ते एक सदस्य दिले जातात.हा भिशी प्रकार विशेषत महिला,कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे.भिशी हा प्रकार प्राइवेट बँकेप्रमाणे काम करतो.जसे बँक ग्राहकांनकडून पैसे जमा करते आणि ज्यांना गरज असते त्यांना देते अगदी त्या प्रमाणे.भिशीमध्ये व्याज नसते. भिशी हा काही ठराविक लोकांनी सुरू केलेला समूह असतो.जर एखाद्या भिशीच्या समू हामध्ये १२ सदस्य असतील तर सर्व सदस्यांकडून जमा केलेली रक्कम एका सदस्याला एकावेळेस दिली जाते.
लिलाव भिशी हा प्रकार सर्वसामान्य नागरिक आणि महिला कमी प्रमाणात वापरतात पण व्यापारी मात्र लिलाव भिशी प्रकार मोठ्या प्रमाणात करतात.लिलाव भिशीमध्ये एक ठराविक रक्कम जमा केली जाते आणि त्या रक्कमेचा लिलाव केला जातो.जो अधिक बोली लावतो.त्याला ती भिशी दिली जाते.या प्रकारात भिशीच्या रक्कमेवर व्याज घेतले जाते.हा व्याजदर बाजारातल्या व्याजदरापेक्षा अधिक असतो.हा संपूर्ण व्यवहार विश्वासावर चालतो.मध्यमवर्गीय किंवा लहान समूहातील भिशीमधून जमा होणारी रक्कम भिशीच्या तुल व्यापारी भिशीच्या तुलनेत फार कमी असते. पण उपयुक्त असते.
भिशी प्रकारांमध्ये घरगुती भिशीचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे.यातप्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते.उदा.ग्रुपमध्ये 10 सदस्य आहेत.तर प्रत्येक सदस्याकडून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला 1 हजार रुपये गोळा केले जातात.जमा झालेले हे 10 हजार रुपये चिठ्ठ्या टाकून ज्या सदस्याचे चिठ्ठीत नाव येईल त्याला दिले जातात.ज्याचे नाव चिठ्ठीत येते त्यांच्या नावाची चिठ्ठी पुन्हा बनवली जात नाही.पण प्रत्येक महिन्याला त्याच 1 हजार रुपयांचा वाटा मात्र घ्यावा लागतो.
1) चिठ्ठी काढणे – या पद्धतीत भिशीद्वारे जमा झालेली एकत्रित रक्कम सभासदांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवून त्यातील एक चिठ्ठी लकी ड्रॉ प्रमाणे काढली जाते.चिठ्ठीत नाव असलेल्या सदस्याला ती रक्कम दिली जाते.
2) लिलाव पद्धत – सर्व सभासदांकडून जमा झालेल्या एकूण रक्कमेचा लिलाव केला जातो.ज्याची बोली सर्वाधिक असते,त्याला ती रक्कम दिली जाते.बोली जितकी लावलेली असते,तेवढी रक्कम जमा झालेल्यातून वजा करून उरलेली रक्कम संबंधित व्यक्तीला दिली जाते.वजा करून घेतलेली रक्कम ही नफा म्हणून इतर सदस्यांमध्ये समान प्रमानांमध्ये वाटून घेतली जाते.
3) पोट भिशी – हा प्रकार लिलाव भिशीमधील एक प्रकार आहे.यामध्ये लिलाव पद्धतीतून जी रक्कम मिळते ती वाटून न घेता एका सदस्याला वापरण्यासाठी दिली जाते

One thought on “भिशी म्हणजे काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *